Recent Courses

Explore All Courses

Have any Queries?

Hit us up if you have questions
image
Our Team

Meet our Mentors

image

Rahul Patil

6+ years of experience
Current Affairs, Economy & Environment
M.A (Sociology), UGC-NET, Diploma (Mechanical Engineering) 
image

Adv. Suresh Bhandwalkar 

5+ years of experience
Essay, GS 2 & PSIR
B.A.,LLB, MA. UGC-NET, SET In Political Science.  
image

Leena Bhangale 

8+ years of experience
Sociology, History & Geography
B.E (Electrical), M.A (Sociology), Experience of 4 mains of UPSC, 4times NET qualified.
FAQS

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेवरील सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेची पद्धत (Pattern) कशी आहे?

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत 2025 पासून पूर्वीच्या objective पद्धतीऐवजी वर्णनात्मक (descriptive) पद्धत लागू आहे. नवीन पॅटर्ननुसार सर्व प्रश्न लेखी स्वरूपात लिहावे लागतात

UPSC Mains आणि MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न एकसारखा झाला आहे का?

हो, दोन्ही परीक्षांचा पॅटर्न बर्‍यापैकी समान झाल्यामुळे दोन्ही परीक्षांचा एकत्र अभ्यास करता येऊ शकतो.

मुख्य परीक्षेत एकूण पेपर्स & मार्क्स किती आहेत?

नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत एकूण 9 पेपर्स आहेत. आणि त्यामधे मराठी व इंग्रजी पेपर्स केवळ qualifying (25% मार्क्स मिळणे आवश्यक) आहेत. 

Merit ठरवण्यासाठी खालील 7 विषयांचे एकूण 1750 गुण ग्राह्य धरले जातात.


Paper 1 – Essay → 250 Marks
Paper 2 – GS-I → 250 Marks
Paper 3 – GS-II → 250 Marks
Paper 4 – GS-III → 250 Marks
Paper 5 – GS-IV (Ethics) → 250 Marks
Paper 6 – Optional-I → 250 Marks
Paper 7 – Optional-II → 250 Marks

Note:
1. मुख्य परीक्षेत उमेदवाराला फक्त 1 Optional विषय निवडावा लागतो. या विषयाचे दोन पेपर्स असतात आणि दोन्ही पेपर्स प्रत्येकी 250 गुणांचे असतात (एकूण 500 गुण)

निबंध (Essay) पेपर कसा असेल?

निबंध पेपर एकूण 250 गुणांचा असून दोन स्वतंत्र विषयांवर प्रत्येकी 125 गुणांचा निबंध लिहावा लागतो. प्रत्येक निबंध विश्लेषणात्मक, सुसंगत आणि रचनाबद्ध असावा तसेच विषयाची सखोल मांडणी, तर्कशुद्धता आणि प्रभावी निष्कर्ष अपेक्षित असतो.

Optional Subjects कोणते उपलब्ध आहेत?

नवीन वर्णनात्मक पॅटर्ननुसार MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत UPSC प्रमाणे Optional Subject निवडण्याची सुविधा आहे. उमेदवार खालील विषयांमधून कोणताही एक विषय निवडू शकतो (या विषयाचे दोन पेपर्स – Optional Paper I & II, प्रत्येकी 250 गुणांचे असतात). 


काही लोकप्रिय पर्यायी विषय खालीलप्रमाणे आहेत:

इतिहास (History)

भूगोल (Geography)

राज्यशास्त्र व सार्वजनिक प्रशासन (PSIR)

अर्थशास्त्र (Economics)

समाजशास्त्र (Sociology)

मानवशास्त्र (Anthropology)

मराठी साहित्य (Marathi Literature)

हिंदी साहित्य (Hindi Literature)

इंग्रजी साहित्य (English Literature)

गणित (Mathematics)

भूगर्भशास्त्र (Geology)

तत्वज्ञान (Philosophy)

वनस्पतिशास्त्र (Botany)

प्राणीशास्त्र (Zoology)

भौतिकशास्त्र (Physics)

रसायनशास्त्र (Chemistry)

कृषी (Agriculture)

सिव्हिल इंजिनियरिंग

मेकॅनिकल इंजिनियरिंग

इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग


(टीप: अधिक Optional विषयांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी MPSC ची अधिकृत अधिसूचना अवश्य पाहा.)

मुलाखतीसाठी (Interview) किती गुण असतात?

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या नवीन पॅटर्ननुसार मुलाखत (Personality Test) एकूण 275 गुणांची असते.

अंतिम मेरिटमध्ये एकूण किती गुण मोजले जातात?

मुख्य परीक्षा (लेखी) + मुलाखत या दोन्ही मिळून अंतिम मेरिट तयार केले जाते. म्हणजेच, लेखी परीक्षेतील 1750 गुण + मुलाखतीचे 275 गुण = एकूण 2025 गुणांपैकी तुमचे मेरिट ठरते.
;